श्री ज्ञानदेव महाराज · Marathi
ज्ञानदेवाची आरती
Dnyandevachi Aarti
संत ज्ञानदेव महाराजांना ज्ञानराजा म्हणून अर्पण केलेली पारंपरिक मराठी आरती.
Original lyrics
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ॥ धृ० ॥
लोपलें ज्ञान जगीं ।
हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग ।
नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥
कनकाचे ताट करीं ।
उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरही ।
साम गायन करी ॥ २ ॥
प्रगट गुह्य बोले ।
विश्व ब्रह्माचे केलें ।
रामा जनार्दनी ।
पायीं मस्तक ठेविलें ॥ ३ ॥