Opening Aarti Setu…

श्री साईबाबा · Marathi

आरती साईबाबा

Aarti Sai Baba

A complete Marathi Sai Baba Aarti traditionally sung in Shirdi, praising Sai Baba as the giver of happiness and seeking refuge at his feet.

Original lyrics

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।
चरणरजतळीं निज दासां विसावां । भक्तां विसावा ॥धृ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरूपी राहे दंग ।
मुमुक्षुजनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥१॥
आरती साईबाबा । जया मनीं जैसा भाव ।
तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ॥२॥ आरती साईबाबा ।
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥३॥
आरती साईबाबा । कलियुगीं अवतार ।
सगुण परब्रह्म साचार । अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर ॥४॥ आरती साईबाबा ।
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥५॥
आरती साईबाबा । माझा निजद्रव्य ठेवा ।
तव चरणसेवा । मागणें हेंचि आतां ।
तुम्हां देवाधिदेवा ॥६॥ आरती साईबाबा ।
इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥७॥
आरती साईबाबा ।