श्री विठ्ठल पांडुरंग · Marathi
पांडुरंगाची आरती
Pandurangachi Aarti
पांडुरंग, विठोबा यांच्या भक्ती, दर्शन आणि आरतीचे वर्णन करणारी पारंपरिक मराठी आरती.
Original lyrics
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरीं जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ।
जय देव जय देव ॥ धृ० ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥ २ ॥
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥ ३ ॥
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ।
दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ ५ ॥